आमदार रवीशेठ पाटील यांची नागोठणेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट

नागोठणे (ता. रोहा) – आमदार रवीशेठ पाटील यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी नागोठणे येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.
साहेबांनी सर्वप्रथम शिव गणेश उत्सव मंडळ, बाजारपेठ नागोठणे येथे श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच सत्यनारायण महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंडळाच्या वतीने किशोर शेठ जैन, नरेंद्र शेठ जैन, प्रकाश शेठ जैन, अनिलजी काळे, अध्यक्ष अंकुश जैन, उपाध्यक्ष सचिन मोदी, अतुल काळे, गौतम जैन, प्रथमेश काळे, संतोष शेठ जैन व इतर मान्यवरांनी आमदार साहेबांचे स्वागत व सन्मान केला. यावेळी पालीचे मणियार साहेब, भाजप सुधागड तालुका अध्यक्ष श्री. ठोंबरे, सिराज पानसरे इतर मान्यवर उपस्थित होते.स्थनिक व्यापाऱ्यांनी आमदार साहेबांचे विशेष आभार मानले. कारण, आमदार सभेनंतर नागोठण्यातील विजेच्या प्रश्नात सुधारणा झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या संदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची विनंती भाजप शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी साहेबांकडे केली.यानंतर आमदार रवीशेठ पाटील यांनी नागोठणे पोलीस स्टेशन येथील गणरायाचे दर्शन घेतले. पोलीस उपनिरीक्षक सचिन कुलकर्णी साहेब व संपूर्ण पोलिस कर्मचारीवर्गाने आमदार साहेबांचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला. साहेबांनी पोलीस स्टेशनच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत सचिन कुलकर्णी साहेब यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
त्यानंतर साहेबांनी प्रभू आळी येथील शंकर मंदिर परिसरातील श्री सन्मित्र मित्र मंडळ, तसेच सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंगर आळी येथे दर्शन घेऊन उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.भेटीच्या शेवटी आमदार रवीशेठ पाटील यांनी के.एम.जी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे उपस्थित राहून मंडळ सदस्य व नागरिकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण दौऱ्यात आमदार साहेबांनी नागोठणेतील विविध मंडळांना दिलेल्या भेटीबद्दल सर्वत्र समाधान व आनंद व्यक्त होत आहे.





