राजकारण

माझी शेवटीची निवडणूक भरघोस मताधिक्यांनी निवडून द्या : महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांचे नागोठणेकरांना आवाहन

 नागोठणे ( विशेष प्रतिनिधी ) – नागोठणे शहर व विभागातील जनता माझे कुटुंब असून नागोठण्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. नागोठण्यातील विकासासाठी मी कधीही भेदभाव न करता भरघोस निधी दिलेला आहे आणि यापुढेही निधीची कमतरता भासू देणार नाही. नागोठणे शहरातील विविध भागात विकास निधी पोहचलेला आहे व विकासकामे देखील झालेली आहेत. नागोठणे जिल्हा परिषद मतदार संघातील नागोठणे हे गाव फार मोठे आहे. आपल्या पेण सुधागड मतदार संघातील सर्व मोठया गावांचे योग्य पद्धतीने नियोजन झाले पाहिजे अभ्यासपूर्ण आखणी करून मला जास्तीतजास्त मतदान झाले पाहिजे. नागोठणे जिल्हा परिषद मतदार संघात लोकसभेला आपण जे मताधिक्य घेतले आहे त्याच्या दुपटीने आता आपल्याला विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घेयायचे आहे. नागोठणे शहरातील वार्ड वाईज कार्यकर्त्यांनी कामाला लागा कारण ही माझी शेवटची निवडणूक आहे. आपल्याला महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवायचे आहे त्यामुळे मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन  पेण सुधागड विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या वतीने भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांनी नागोठणेकरांiना केले. सोमवार दि. 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता आमदार रवीशेठ पाटील यांच्या मोदी मैदान नागोठणे येथील  त्यांच्या संपर्क कार्यालयात नागोठणे शहरातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना , बूथ अध्यक्षांना मार्गदर्शन करताना आमदार रविशेठ पाटील बोलत होते.  दरम्यान या कार्यक्रमांची सांगता झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके यांच्या निवासस्थानी आमदार रविशेठ पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व प्रमुख कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

                  यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके, भाजप नेते मारुती देवरे, शहर अध्यक्ष सचिन मोदी, राष्ट्रवादीचे नेते हरीशशेठ काळे, विलास चौलकर, प्रकाशशेठ जैन, राष्ट्रवादी नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, जिल्हा उपाध्यक्ष  श्रेया कुंटे,  ता. सरचिटणीस  आनंद लाड, राष्ट्रवादी युवा नेते प्रथमेश काळे, महिला मोर्चा ता. अध्यक्ष अपर्णा सुटे, राष्ट्रवादीचे नेते कृष्णा धामणे, शिवसेना शिंदे गट नेते मनोज खांडेकर, भाजप नेते सिराज पानसरे,राजन दुबे, शेखर गोळे, बिपीन सोष्टे, दिलीप शहासने, मनोज टके,  भारत भोय, शंकर भालेकर, शिवसेना शिंदे गट विभाग अध्यक्ष प्रविण ताडकर, शहर प्रमुख संतोष चितळकर, उमेर सांगडे, कोंडीराम आखाडे, संजय कणघरे, विवेक रावकर, तिरत पोलसानी, तात्या पोत्रिक, वसिम बोडेरे, अमित खांबकर,  ऍड. रमेश जाधव, गौतम जैन, घनश्याम ताडकर, नामदेव ताडकर, प्रियांका पिंपळे, शितल नांगरे, मुग्धा गडकरी आदिंसह बहुसंख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागोठणेचे माजी सरपंच राष्ट्रवादीचे नेते विलास चौलकर यांनी केले.

गर्जा महाराष्ट्र टीम

संपादक | सचिन मोदी .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!