नागोठणे भाजप कडून आमदार रवी पाटील साहेबांचे अभिनंदन!
संपूर्ण जिल्ह्यातून आमदार साहेबांवर शुभेच्छा चा वर्षाव
आमदार रवी पाटील साहेबांचे नागोठणा भाजप तर्फे अभिनंदन.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पेण विधानसभा मतदारसंघाने जवळजवळ 47 हजार मतांची लीड दिल्यामुळे खासदार सुनील तटकरे साहेब यांचा विजय सुखर झाला. सर्वात जास्त आघाडीही पेण विभागाने दिल्याने आमदार रवी पाटील साहेब यांचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मारुती देवरे, शहराध्यक्ष सचिन मोदी ,सरचिटणीस आनंद लाड शिक्षण सेलचे उमाळे सर व अहिरे सर यांनी पेढे भरून व फुलगुच्छ देऊन आमदार साहेबांचे अभिनंदन केले. आमदार रवी पाटील साहेब , धैर्यशील दादा पाटील साहेब यांनी भरपूर मेहनत करून न भूतो न भविष्य अशी आघाडी ही पेन मतदार संघातून दिली आहे. विरोधकांनी कितीही दिशाभूल केली तरी पेण मतदार संघाची जनता ही महाविकास आघाडी सोबत राहिली. निश्चितच आमदारवी पाटील साहेब व जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहेत. लवकरच पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत त्यावेळी संपूर्ण नागोठणे विभागात मोठा जल्लोष करण्यात येणार आहे असे भाजप शहरअध्यक्ष सचिन मोदी यांनी सांगितले या जल्लोषासाठी आमदार रवीशेठ पाटील व जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा आवर्जून उपस्थित राहतील असे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी सांगितले.लवकरच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची ही एक झलक आहे निश्चितच या ठिकाणी महायुतीचे आमदार प्रचंड मत अधिक्याने निवडून येतील.असा विश्वास तालुका सरचटिणीस आनंद लाड यांनी व्यक्त केला
विधानसभा निवडणुकीत भाजप मुसंडी मारणार: सचिन मोदी
येत्या काही महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक लागणार आहेत. विरोधकांच्या भूलथापांना आपण भूललो असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले आहे .त्यामुळे आता महाराष्ट्राची जनता कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही त्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत तसेच या विधानसभा निवडणुकीत भाजप जोरदार मुसंडी मारणार आहे असा विश्वास भाजप नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी पत्रकाशी बोलताना व्यक्त केला