नागोठण्यात भाजप उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
डोअर टू डोअर प्रचारात रविशेठ पाटील यांची आघाडी
पेण नगरपरिषद च्या मा .नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या प्रमुख उपस्तिथ नागोठणे शहरात डोर टू डोर प्रचाराची सुरवात
रविशेठ पाटील व महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणला
नागोठणे (विशेष प्रतिनिधी) : पेण सुधागड विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या वतीने भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ नागोठण्यातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा, महिला वर्गाचा व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार फेरीत रविशेठ पाटील यांची प्रचार पत्रके वाटून डोअर टू डोअर प्रचारही करण्यात आल्याने नागोठण्यातील प्रचारात रवीशेठ पाटील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. या प्रचार फेरीत रविशेठ पाटील व महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. महायुती सरकारने तरुण वर्गापासून ते महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध नागरिक तसेच समाजातील सर्वच घटकांसाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे जनता महायुती सरकारवर बेहद्द खुश आहे. त्यामुळेच आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठीशी नागोठणे परिसरातील मतदारही ठामपणे उभे असल्याचे या प्रचारफेरी दिसून आमदार रवीशेठ पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ नागोठण्यात गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता काढण्यात आलेल्या या प्रचारफेरीची सुरुवात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन करण्यात आली. नंतर ही प्रचार फेरी बाजारपेठ, खुमाचा नाका, गवळ आळी, रमाई नगर, मराठा आळी, कुंभार आळी, प्रभू आळी, गांधी चौक मार्गे श्री जोगेश्वरी मंदिरात पोचल्यानंतर दुपारी दीड वाजता या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.
भाजपचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांच्या नागोठण्यातील या प्रचार फेरीत राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, हरीशशेठ काळे, विलास चौलकर, आमदार रविशेठ पाटील यांच्या स्नुषा व पेणच्या मा. नगराध्यक्षा प्रितमताई पाटील,भाजप नेते मारुती देवरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, भाजपा नेते अनंत वाघ, किशोरभाई म्हात्रे, राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, प्रकाशशेठ जैन, सुधाकर जवके, भाजप नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, दर्शन बाफना, निखिल मढवी, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष रऊफ कडवेकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष अपर्णा सुटे, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष चितळकर, अमित खामकर, दिलीप शहासने, मनोज टके, केतन भोय, विठोबा माळी, विवेक रावकर, प्रमोद गोळे, तिरत पोलसानी, अशोक अहिरे, गणेश घाग, ऍड. गणेश जाधव, अंकुश सुटे, सुरेश जैन (डॉक्टर), सखाराम ताडकर, घनश्याम ताडकर, मोरेश्वर सागडे, गौतम जैन, आसिफ बोडेरे, उमेर सांगडे, अरशान फामे, निहाल कडकेकर, शगिर पानसरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुजाता जवके, आशा शिर्के, प्रतिभा तेरडे, भाजपा महिला आघाडीच्या शितल नांगरे, मुग्धा गडकरी, प्रियांका पिंपळे, सोनाली पडवळ, संज्योती लाड, फातिमा सय्यद, कौसर अन्सारी, रेश्मा अत्तार, समीरा बोडेरे आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचारफेरीत बहुसंख्येने सहभागी झाले होते.