नागोठणे येथे मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी सण थाटात साजरा केला !

इस्लाम धर्माचे संस्थापक व गुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशे वी पवित्र ईद मिलादुन्नबी सन सालाबाद प्रमाणे याही वर्षी नागोठणे गावांमध्ये थाटात संपन्न करण्यात आला. एक दिवस अगोदर आदल्या दिवशी रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी पहाटे चार वाजेपर्यंत लहान मुलांनी पवित्र कुराणाचे वाचन करीत नात शरीफ जलसा साजरा केला. त्यावेळी लहान लहान मुलांनी त्या जलसा मध्ये सहभाग घेतला होता .शुक्रवार दुसऱ्या दिवशी मस्जिद नागोठणे येथून संध्याकाळी चार वाजताच्या असरची नमाज पठण करून सर्व मुस्लिम बांधवांनी ईदुल मिलादुन्नबीची मिरवणूक थाटात गावात काढली होती .त्या मिरवणुकीमध्ये गोड पदार्थ खीर थंडा पेय सरबतचे सर्व मुस्लिम बांधवांना वाटप करण्यात आले. जशन जुलूस मिरवणुकीमध्ये मस्जिद नागोठणेचे इमाम यांनी नाते शरीफचे गायन करीत तिन्ही मूल्यांमध्ये आकर्षित असे रंगेबिरंगी पतक्यांचे बावटे व रंगीबिरंगी तोरण घरावरती सजून रोषणाई केले होते. सुगंधित लोबान फुल स्वरूपात धूमधाम धडाक्यात हजरत मोहम्मद पैगंबरांची पंधराशे वी पवित्र ईद-उल मिलादुन्नबी सण साजरा केला .ह्या जसने जुलूस मिरवणुकीची सांगता संध्याकाळी साडेसाह वाजता मज्जिद नागोठणे येथे करण्यात आली. यावेळी मोठे संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

